ताज्या घडामोडी

देशाचा ७७ वा स्वातंत्र्यदिवस महावितरण चंद्रपूर परिमंडळात सर्वत्र उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट

देशाचा ७७ वा स्वातंत्र्यदिवस आज महावितरण चंद्रपूर परिमंडळात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला.मा. सुनिल देशपांडे, मुख्य अभियंता, चंद्रपूर परिमंडळ यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले व त्यांनी तिरंग्यास मानवंदना अर्पण केली. याप्रसंगी श्रीमती संध्या चिवंडे, अधिक्षक अभियंता, चंद्रपूर मंडळ, चंद्रशेखर दार्वेकर, कार्यकारी अभियंता, चंद्रपूर विभाग,  सुशील विखार, उपमुख्यऔद्योगिक संबंध अधिकारी (प्रभारी),  राकेश बोरीवार, वरिष्ठ व्यवस्थापक (विवले),  विजयकुमार राठोड, कार्यकारी अभियंता (प्रशासन-प्रभारी) चंद्रपूर मंडळ, प्रशांत ठाकरे, कार्यकारी अभियंता (प्रभारी),चाचणी विभाग व सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी तिरंग्यास मानवंदना अर्पण केली.
चंद्रपूर परिमंडळ कार्यालय परिसरात याप्रसंगी मुख्य अभियंता व इतर अधिकारी व कर्मचारी यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व जाणून वृक्षारोपण केले. चंद्रपूर विभाग अंतर्गत चंद्रपूर ग्रामीण वउपविभाग 2 उपविभाग मध्ये याप्रसंगी रक्तदान आयोजित करण्यात आले होते. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद देत कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये