ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शहरात विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

शहरातील विविध शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय व संस्थेत स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

नगर परिषद येथे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, तहसील कार्यालय येथे तहसीलदार अनिकेत सोनवणे, वनपरिक्षेत्र कार्यालय क्षेत्र सहाय्यक विकास शिंदे, भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती येथे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, जीवन ज्योती औद्योगिक निवासी कर्मशाळा येथे व्यवस्थापकीय अधिक्षक प्रतीक व्यवहारे, मच्छिंद्र मच्छीमार सहकारी संस्थेत अध्यक्ष दिलीप मांढरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कूल येथे मुख्याध्यापक मिलिंद वाघमारे, छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय कोंडा येथे संस्थापक सचिव पायपरे सर, प्रियदर्शनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे अध्यक्ष धनंजय गुंडावार, श्री साई औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे अध्यक्ष किशोर पत्तीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्याचा 77 व वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये