नगर परिषदचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी अरुण मोकळं यांना नाहक बदनाम करणारे शिवसेना शिंदे गट तालुका प्रमुखचा केला निषेध

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
बालाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देऊळगाव राजा नगरीचा न भूतो न भविष्यती असा विकास करणारे शहराचा कायापालट करणारे लोकप्रिय मुख्याधिकारी अरूण मोकळं यांना नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न शिवसेना शिंदे गट चे तालुका प्रमूख अनिल चित्ते यांनी सुरू केला आहे, बिनबुडाचे आरोप त्यांच्यावर ठेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव आणत असल्याचा आरोप केला असून, त्यांच्या या कृतीचा निषेध विविध सामजिक संघटनांनी निवेदनातून केला आहे.
अरुण मोकळं यांनी आपल्या कारकीर्दीत लोकप्रतिनिधी च्या साहाय्याने शहरात करोडो रुपयांची विकास कामे करत शहराचा कायापालट केला आहे, सौंदर्यीकरण केले आहे,शहरातून जाणाऱ्या महामार्गाला अतिक्रमण च्या विळख्यातून बाहेर काढले आहे, केवळ आंबेडकर पुतळ्याजवळ काही नागरिकांनी विरोध केल्यामुळे सिमेंट रोड चे काम रखडले आहे.
शहरात सुद्धा अनेक विकास कामे करत लोकप्रियता मिळवली आहे, अशा कर्तव्य दक्ष लोकप्रिय मुख्याधिकारी अरूण मोकळं यांच्यावर खोटे बिनबुडाचे आरोप करणाऱ्या तालुका प्रमूख ला शिवसेनेच्या नेत्यांनी समज द्यावी अन्यथा या नेत्याच्या तोंडाला काळे फासून, महीला मंडळाच्या वतीने बांगड्या भरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.
निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव, माजी आमदार शशीकांत खेडेकर, जिल्हा प्रमूख बळीराम मापारी यांना पाठविलेल्या आहे,निवेदनावर माजी नगराध्यक्ष तुकाराम खांडेभराड, संतोष खांडेभराड, गोविंदराव झोरे, दिपक बोरकर, राजेंद्र खांडेभराड, विष्णू भाऊ झोरे, पवण झोरे, विजय खांडेभराड, देवानंद शिंगणे सह परिसरातील अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.