Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी – नागरिकात भीतीचे वातावरण

ऊसरपार चक येथील घटना ; वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

सावली तालुक्यातील ऊसरपार चक येथील गुराख्यावर शनिवार रोजी दुपारच्या सुमारास पट्टेदार वाघाने हल्ला चढवून जखमी केले.

सुरेश दाजगाये वय ४३ रा. ऊसारपार चक वाघाने जखमी केलेल्या व्यक्तीचे नाव असून नेहमीप्रमाणे आपल्या घरचे बैल व म्हशी घेऊन पालेबारसा बीट क्र.१४८ जवळ असलेल्या तलावाजवळ गेला असता दबा धरून असलेल्या वाघाने त्याच्यावर अचानकपणे हल्ला चढविला असता त्याच्या आवाजाने जवळ असलेल्या गुराख्यांनी वाघ दिसताच आरडाओरड केली त्यामुळे वाघाने तिथून पळ काढला यांची माहिती वन विभागाला मिळतात वन विभागाने लगेच जखमीला दवाखान्यात नेण्यात आले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सावली, पी.जी.विरुटकर,क्षेत्र सहाय्यक पाथरी, एन बी पाटील, वाय.डब्ल्यू.पोईनकर,के.एन. गोडसेलवार उपस्थित होते.

तसेच वन्यप्राण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्याच्या विपरीत परिणाम मानवावरील हल्ले व गावातील पशुधनावर हल्ले होताना दिसून येत असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. तरी वन विभागाने वाघाच्या बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये