Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारतीय आझाद कॉंग्रेस पक्षाचे ध्वजरोहन आणि शाखा फलक अनावरण कार्यक्रम

पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष अय्युब भाई कच्छी यांचा हस्ते होणार ध्वजारोहण आणि फलक अनावरन

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर येथे भारतीय आझाद कॉंग्रेस पक्षावे पक्ष प्रमुख मा अय्युब भाई कच्छी जी यांच्या शुभहस्ते दिनांक १५/०८/२०२३ रोजी स्वतंत्रादिना निमित्त मुख्य दादमहेल वॉर्ड येथे ध्वजारोहण कार्यक्रम आणि शाखा फलक अनावरण करण्यात येणार आहे. तसेच रहेमतनगर चंद्रपूर येथे पक्षाचे शहर व जिल्हा कार्यालय मुस्तफा लक्कडशाह कॉम्प्लेक्स मध्ये जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तरी सर्व नागिरकांनी दक्षता पूर्वक लक्षात ठेऊन पक्षा तर्फे आयोजित सर्व कार्यक्रमास आवार्जून उपस्थित राहावे असे भारतीय आझाद कॉंग्रेस पक्षाचे प्रसिध्दी प्रमुख शोएब कच्छी यांनी कळविले आहे.

या कार्यक्रमात पक्ष प्रमुख अय्युब भाई कच्छी जी, शोएब कच्छी, अर्शद कच्छी, अरबाज कच्छी, नगर पालिका निवडणूक प्रमुख अल्ताफ शेख, शेख ताजुद्दिन, पक्षाचे महानगर प्रमुख देवेंद्र हिंगोरानी, शफकात खान, सय्यद वसीम, शेख वाहीद, शेख बाबा भाई, सागर बेले, सुजन गिरी, जिल्हा निरीक्षक युवक विभाग अमन कच्छी, साबीर हुसैन, मुस्ताक शेख, वसीम खान, सुहास रामटेके, व इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार.

पक्षातर्फे वीज बिल मध्ये झालेल्या दर वाढीव रद्द करण्याबाबत चर्चा करणे, पक्षाचे सर्व जिल्हा तथा शहर स्तरावर शाखा उघडणे, येत्या काळात येणाऱ्या सर्व निवडणुका लढविण्यावर सविस्तर चर्चा करणे, आणि पक्षाचे सभासद नोंदणी कार्यक्रम जोमाने चलविण्याकरिता चर्चा करणे, व इतर नागरिकांचे हक्क संविधानाच्या अधीन राहून मिळउन देणे बाबत चर्चा होणार आहे. असे भारतीय आझाद कॉंग्रेस पक्षाचे प्रसिध्दी प्रमुख शोएब कच्छी यांनी एका पत्रकद्वारे कळविले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये