ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांना स्पर्धा पुस्तक वाटप व व्यसनमुक्ती मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :- येथील अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील १२ वी च्या विद्यार्थ्यांना स्पर्धा पुस्तक वाटप करून व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन करण्यात आले.

हुतात्मा गोपाळराव हर्षे यांचे नातू, समाजसेवक तसेच कलावंत दादासाहेब फाळके पुरस्कार, महात्मा गांधी नोबेल पीस अवार्ड व इंटरनॅशनल शांतीदूत समाजरत्न पुरस्कार प्राप्त व मानवकुटी जीवन संशोधन केंद्राचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. संजय प्रभाकरराव हर्षे अभिनेता, पत्रकार, शिक्षणतंज्ञ, साहित्यीक, हेल्थकेअर योगा व नॅचरोपॅथी, अॅस्ट्रालॉजीस्ट, न्यूमरॉलॉजीस्ट व सेल्फ हिप्नोसीस यांनी मानवकुटी जीवन संशोधन केंद्रामार्फत दान स्वरूपात २ ऑक्टोंबर गांधी जयंती सप्ताहाच्या अवचीत्य साधुन ब्रम्हपुरी येथील अनुदानीत माध्यमिक व उच्चमाध्यमिक आश्रम शाळा (श्री रमेशजी आमले) वडसा रोड येथील १२ वी च्या मुला मुलींना स्पर्धा पुस्तकांचे वाटप दि. ०५/१०/२०२६ ला करून समाजात समाजसेवेचे आदर्श घडवुन दिले. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथि मा. हर्षा पर्वनी उपविभागीय दंडाधिकारी, ब्रम्हपुरी व मा. डॉ. सलामे मुख्याधिकारी नगर परिषद ब्रम्हपुरी, तसेच अध्यक्ष मा. श्री. देवीदासजी जगनाडे माजी प्राचार्य गो.वा. कॉलेज नागभिड व कै. विठोबाजी आमले आदिवासी शिक्षण संस्था ब्रम्हपुरीचे अध्यक्ष श्री. रमेशजी आमले यांचे प्रमुख उपस्थितीत व यांचे शुभहस्ते वाटप करण्यात आले. व व्यसनमुक्तीचा वाईट परिणाम स्वतः वर आणि परिवारावर व समाजावर कसा होतो यावर सर्व प्रमुख वक्ते यांनी खासकरून प्रकाश टाकला. तर स्पर्धा पुस्तकाचे महत्व सांगून विद्यार्थ्यांना शासकीय अधिकारी MPSC व UPSC च्या परिक्षा देवून कसे होता येते. याबद्दल सविस्तर मार्गदर्शन आपल्या भाषनाद्वारे प्रमुख अतिथि व मा. अध्यक्षांनी पटवून दिले.

प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय माजी प्राचार्य डॉ. संजय हर्षे यांनी केले तर सुत्रसंचालन प्रा. देशपांडे सर व आभार प्रदर्शन प्रा. धकाते सर यांनी केले. व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. मागील वर्षी सुध्दा डॉ. संजय हर्षे यांनी गांधी जयंतीच्या दिवशी ख्रिस्तानंद हॉस्पीटल व सरकारी हॉस्पीटल मधील जेष्ठ व गरजू रोगींना “गांधी काठी” दान स्वरूपात देवून एक समाजउपयोगी उपक्रम राबविला होता.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये