गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दारू विक्रेत्याला तीन वर्षांची शिक्षा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वाढोणा येथील दारू विक्रेत्याला स्थानिक न्यायालयाने तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हा निर्णय न्यायमूर्ती वी.आर. धराक यांनी दिली आहे.विजय राऊत (40) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

वाढोना येथील रहिवासी दारू विक्रेते विजय राऊत याला हातभट्टीपासून बनवलेली दारू विक्री करताना पोलिसांनी १९ नोव्हेंबर २०१५ रोजी रंगेहात पकडले होते. त्याच्याविरुद्ध आर्वी पोलिस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. प्रवीण जुवारे यांनी या प्रकरणाचा तपास करून न्याय मिळवून दिला होता. बेकायदेशीरपणे दारू विक्री केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध ठोस पुरावे असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. या प्रकरणी सरकारच्या वतीने एड. ए. डब्ल्यू. जुन्नार यांनी काम पाहिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती वी.आर. धराक यांनी आरोपी विजय राऊत याला वरील शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये