गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अट्टल गुन्हेगारांकडुन दोन मोटरसायकल हस्तगत

एकूण किंमत १ लाख ५ हजाराचा मुद्देमालासह चोरीचे गुन्हे उघडकीस

चांदा ब्लास्ट

चंद्रपुर जिल्हयामध्ये होत असलेल्या वाहन चोरीच्या गुन्हयांना आळा घालण्याकरिता मा. पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस- निरिक्षक मा. महेश कोडावार यांनी विशेष पथक तयार करून त्यांना त्याबाबत निर्देश दिले होते. पोलिस निरीक्षक महेश कोडावार स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांचा मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर चे पथक हे मोसा चोरीचे रेकॉर्डवरिल गुन्हेगार शोध मोहीम पेट्रोलिंग राबवीत असतांना छोटी बाजार चौक येथे जावुन सापळा रचून मो.सा रेकॉर्डवरील आरोपी नामे सोनु उर्फ चड्डा बुधाजी दहीवडे वय 27 वर्ष रा. आंबेडकर चौक वार्ड क्र 2 दुर्गापुर जि. चंद्रपुर यांना ताब्यात घेवुन त्याचे सदर मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहे.

पो. स्टे. पडोली अप. क्र. कलम २५२/२३ कलम ३७९ भांदवी मोटार सायकल किँमत ६० हजार तसेच २५३/२३ कलम ३७९ भांदवी मोटार सायकल किँमत ४५ हजार एकूण किंमत १ लाख ५ हजारांचा मुद्देमालासह चोरीचे गुन्हे उघडकीस करण्यात आले.

सदरची यशस्वी कामगीरी पोलीस अधिक्षक चंद्रपूर, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पो.नि. महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांचे नेतृत्वात पो.उप.नि. विनाद भुरले पो.हवा. संजय आतकुलवार, नापोकॉ संतोष येलपुलवार, व पो.अ. नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये