Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डेंग्यू मलेरियाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करा

भाजप जिल्हा महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांनी दिले आयुक्तांना पत्र

चांदा ब्लास्ट

चंद्रपूरात पावसाची संततधार सुरूच असून यामुळे होणारे डेंगू मलेरिया या साथीच्या रोगाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे हे अतिशय चिंतेची बाब आहे. स्थानिक प्रशासनाने प्रतिबंधक उपाय योजना राबवत प्रमुख्याने जनजागरण मोहीम म्हणून प्रतिबंधात्मक औषधी फवारणी फॉगिंग आदींवर भर द्यावा,
असे पत्र नुकतेच मा.ना.श्री सुधीर मुनंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप जिल्हा महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांनी प्रशासनाला दिले. पावसाळ्याचे दिवस सुरु डेंगू या आजारावर प्रतिबंध घालावा, यासाठी मनपाने प्रभावी उपयोजना करण्यात यावी, अशी मागणी भाजप जिल्हा महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांनी आयुक्त यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. पावसाळा सुरू असल्याने डासांचे प्रमाण वाढले असून डेंगू इतरत्र पसरू नये, म्हणून यावर ठोस उपाय योजना व नियमित फवारणी व फॉगिंग शहरातील संपूर्ण भागामध्ये करण्यात यावी व डेंगू सारख्या आजाराने कोणीही आजारी पडू नये,
याकरिता उपाय योजना मनपाने करावी, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून भाजप जिल्हा महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांनी महानगरपालिकेचे आयुक्त  यांच्याशी याबद्दल संवादही साधला आहे
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये