चंद्रपूर जिल्ह्यातील विविध उद्योग प्रतिनिधींसोबत एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचा संवाद
कौशल्य आधारित शिक्षणाकरिता विद्यापीठाचा पुढाकार

चांदा ब्लास्ट
या बैठकीला प्र – कुलगुरू डॉ. रुबी ओझा यांनी मार्गदर्शन करून विद्यापीठाचा उद्देश सांगितला. विद्यापीठाला सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे अशी अपेक्षा व्यक्त केली. विद्यापीठ आपल्यापर्यंत आलय यात आपल्या सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.
सदर बैठकीला विद्यापीठाच्या शैक्षणिक तंत्रज्ञान विभागाच्या विभागप्रमुख तथा बल्लारपूर कॅम्पस च्या शैक्षणिक समन्वयक डॉ. जयश्री शिंदे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी अभ्यासक्रमाविषयी माहिती दिली व अभ्यासक्रमात स्थानिक गरज काय आहे जेणेकरून विद्यार्थिनींना कौशल्य आधारित शिक्षण मिळेल यासाठी आवश्यक बाबी विषद केल्या. सोबतच उपस्थित प्रतिनिधी मधून आवश्यक सूचना जाणून घेतले. यावेळी शैक्षणिक सल्लागार मंगेश इंदापवार, सहायक कुलसचिव डॉ. बाळू राठोड, समन्वयक वेदानंद अलमस्त विशेषत्वाने उपस्थित होते.
या आवारात प्रामुख्याने या सत्रात बीएमस-मार्केटींग मॅनेजमेंट, बीएमएस- प्रॉडक्ट अॅण्ड इंडस्ट्रियल मॅनेजमेंट, बीएमएस- रुग्णालय प्रशासन, बी.व्होक-फुड टेक्नॉलॉजी, बी.व्होक-इंटिरियर डिझाईन आणि बॅचलर ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन हे अभ्यासक्रम सरू करण्यात आले आहे . हे सर्व अभ्यासक्रम नव्या शैक्षणीक धोरणातील घटकांना अनुसरून असून कौशल्य विकासावर भर देणारे आहे.सभेत कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रमाला लागणाऱ्या महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत सकारात्मक संवाद झाला जेणेकरून भविष्यात चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थिनींना कौशल्य आधारित शिक्षणासाठी पुढे आणणे सोयीचे होईल. विद्यार्थिनींना प्रत्यक्ष फील्ड वर जाऊन अभ्यास करायला मिळेल सोबतच प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळेल. विद्यापीठाच्या या पुढाकाराविषयी सर्व प्रतिनिधींनी कौतुक केले. या बैठकीचे आभार सहायक कुलसचिव डॉ. बाळू राठोड यांनी मानले.