Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

प्रशासकीय भवनाच्या इमारतीत मोठी आग – मनपा व औष्णिक विद्युत केंद्राचे अग्निशमन दल घटनास्थळी

जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयासह अनेक महत्त्वाची कार्यालये ह्याच इमारतीत

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी

जितेंद्र चोरडिया चंद्रपूर

चंद्रपूर येथील बस स्थानकाच्या समोर असलेल्या प्रशासकीय भवनात आग लागल्याची घटना रविवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी पहाटे 5 वाजताच्या सुमारास उघडकीस आली असुन चंद्रपूर मनपा तसेच महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. दोन्ही विभागांच्या मिळुन 7 – 8 अग्निशमन वाहन घटनास्थळी पोहचले आहेत. ही आग तिसऱ्या मजल्यावर असलेल्या अंन व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयाला लागली असुन ह्या कार्यालयात कारवाई करून जप्त करण्यात आलेले अवैध तंबाखू, अंमली पदार्थ व इतर प्रकारचे साहित्य मोठ्या प्रमाणावर असुन ह्यातील बरेच साहित्य व कागदपत्रे आगीत स्वाहा झाले असण्याची शक्यता आहे.

प्रशासकीय भवन ह्या इमारतीत विविध शासकीय कार्यालये आहेत. ज्याठिकाणी दररोज शेकडो लोक शासकीय कामाकरीता येत असतात. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जिल्हा माहिती अधिकारी, अन्न व औषधी प्रशासन विभाग, ही महत्त्वाची कार्यालये ह्याच इमारतीत असुन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली आहे. महत्वाचे म्हणजे ह्या इमारतीच्या अगदी शेजारीच जिल्हा न्यायालय, दुसऱ्या बाजुला रामनगर पोलीस ठाणे, मागील बाजुला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय असल्याने हा परिसर महत्त्वाचा व संवेदनशील समजल्या जातो.

पहाटे फिरण्यास निघालेल्या नागरिकांना प्रशासकीय भवनाच्या दुसऱ्या मजल्यातुन मोठ्या प्रमाणात धुर निघत असल्याचे दिसल्याने त्यांनी शहानिशा केली असता तिथे आग लागल्याचे निष्पन्न झाले. काही जागरूक नागरिकांनी तत्काळ अग्निशमन विभागाला आगीची माहिती कळवली. आगीची तीव्रता व इमारतीचे महत्त्व लक्षात घेता मनपा व चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आगीचे नेमके कारण व वेळ मात्र अजुनही स्पष्ट झालेले नाही.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये