ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदा पब्लिक स्कूल येथे आई व चिमुकल्यांचे रॅम्प वॉक

कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले

चांदा ब्लास्ट

आई आणि मुलांचे नाते हे प्रेम आणि जिव्हाळ्याचे असते. मुल आपल्या आईसोबत खुप सुरक्षित अनुभव करतात हे लक्षात घेऊन चांदा पब्लिक स्कूल मध्ये पुर्व प्राथमिक विभागाअंतर्गत दिनांक 5 ऑगष्ट 2023 रोजी रॅम्प वॉक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये जुन्या वृत्तपत्रापासुन विविध प्रकारचे पोशाख तयार करून व चिमुकल्यांनी ते घालून आपल्या आईसोबत उत्कृष्ठ प्रकारे रॅम्प वॉक चे प्रदर्शन केले. रॅम्प वॉक करत असतांना पोशाखामधील नाविण्यपूर्ण कलाकृती व विविधता बघायला मिळाली.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने आणि अतिथींच्या स्वागताने करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वैशाली रोहनकर व उज्वला धांडे हे लाभले. चांदा पब्लिक स्कूलच्या संचालीका श्रीमती स्मिता संजय जीवतोडे यांनी कार्यक्रमाचे कौतुक करीत चिमुकल्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आईने तयार केलेल्या कलाकृतीची प्रशंसा केली व पालकांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे कौतुक केले. शाळेच्या प्राचार्या सौ. आम्रपाली पडोळे यांनी विद्यार्थ्यांसोबत पालकांचे देखील अभिनंदन केले.

ही स्पर्धा पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ. शिल्पा खांडरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका पुजा मिश्रा आणि रिना शाहा यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षिका मंजुश्री नवरखेले यांनी केले. उत्कृष्ठ जोडी निवडण्याचे व पारितोषिक वितरणाचे कार्य परिक्षकांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये