ताज्या घडामोडी

वर्धा पोलीसांचे सोशल मिडीयाच्या हालचालीवर लक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सोशल मिडीयाच्या वाढत्या वापरासोबतच त्या संबंधाने होणाऱ्या ऑनलाईन हरॅसमेंट, हेटस्पीच या प्रकारच्या गुन्ह्याचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे. सदर गुन्ह्यांवर आळा घालण्याकरीता वर्धा पोलीस दलामध्ये सायबर पोलीस स्टेशन अंतर्गत सोशल मिडिया इंटेलीजंस सेल गठीत करण्यात आला आहे. सदर सेलद्वारे सोशल मिडीयाच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे.

तसेच वर्धा जिल्हा पोलीसद्वारे चालविण्यात येत असलेल्या फेसबूक पेज, इंस्टाग्राम अकाउंट, व्टिटर हॅंडल, युटयूब चॅनल, व्हॉट्सअॅप ब्रॉडकास्ट यांचे माध्यमातून नवनविन सायबर गुन्हे संबधाने माहिती, वर्धा पोलीसद्वारे करण्यात आलेली कामगिरी तसेच जनहितार्थ माहिती प्रसारित करण्यात येत आहे. वर्धा जिल्हयातील सामान्य नागरीक त्यांची तक्रार सुध्दा या माध्यमांद्वारे करु शकतात.

मा. पोलीस अधीक्षक वर्धा श्री नूरूल हसन यांचेकडून आवाहन करण्यात येत आहे कि, नागरिकांनी खालील नमूद लिंक्सवरून वर्धा पोलीसचे सोशल मिडिया फॉलो करावे तसेच दिलेला व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपली काही तक्रार किंवा सूचना असल्यास कळवावे.

*Whatsapp* No. 7058867351

*Facebook*
@Wardhapolice
https://www.facebook.com/wardhapollice/

*Twitter*
@वर्धा पोलीस_Wardha Police

*Instagram*
@ wardha_police
https://www.instagram.com/wardha_police/?hl=en

*Youtube*
@wardhapolice2555
https://www.youtube.com/@wardhapolice2555

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये