चंद्रपूर : येथील सरदार पटेल महाविद्यालयात दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

चांदा ब्लास्ट
महाविद्यालयाच्या ग्रंथालय परिसरात महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम.काटकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजित पवार यांचे राज्याच्या विकासातील योगदान तसेच सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी केलेले कार्य महत्त्वपूर्ण असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम.काटकर यांनी नमूद केले.
दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, शेख रमजान, सुरेश पोटदुखे, जीनेश पटेल यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या.



