ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या जिवती तालुकाध्यक्षपदी श्री दास राठोड यांची नियुक्ती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने सामाजिक कार्याची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते श्री दास राठोड यांच्यावर संघटनेची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांची महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या जिवती तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण समाधान भोटकर यांच्या आदेशानुसार तसेच प्रदेश उपाध्यक्ष सुरज एस. यादव यांनी दिलेल्या नियुक्तीपत्रानुसार ही नियुक्ती करण्यात आली. रुग्णसेवा, सामाजिक बांधिलकी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.

नियुक्तीनंतर बोलताना नवनियुक्त तालुकाध्यक्ष श्री दास राठोड यांनी, “रुग्णसेवक संघटना प्रत्येक रुग्णाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. रुग्णसेवेत हलगर्जीपणा, अन्याय व भ्रष्टाचार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. रुग्ण आणि कामगारांच्या हक्कांसाठी संघटना सातत्याने लढा देईल,” असा ठाम विश्वास व्यक्त केला.

या नियुक्तीनंतर विविध सामाजिक, राजकीय, कामगार आणि रुग्णसेवा क्षेत्रातील मान्यवरांनी श्री दास राठोड यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नियुक्तीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील रुग्णसेवा अधिक सक्षम होण्यासह कामगारांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेचे कार्य अधिक प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये