ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 78 वा वर्धापन दिनानिमित्त बस स्थानक परिसरात वृक्षारोपण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई च्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला त्या अनुषंगाने देऊळगाव राजा बस स्थानकाच्या प्रांगणामध्ये सुद्धा वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीसेवानिवृत्त कार्यकारी अभियंता राका चे ज्येष्ठ नेते घनशीराम शिपणे होते.त्यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य प्रवासी कल्याण संस्थेचे प्रा विनायकराव कुलकर्णी यांनी सुद्धा एसटी महामंडळामंडळाच्या कार्याविषयी माहिती दिली . एस टी महामंडळाचे वाहतूक नियंत्रक श्री गायकवाड, श्री सानप, श्री खारडे, श्री खांडेभराड, श्री अवचार सौ खिल्लारे ताई यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले .स्वागत समारंभ नंतर बस स्थानक परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

     याकार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष संतोषभाऊ खांडेभराड, दादाराव खार्डे, गटशिक्षणाधिकारी दादाराव मसुदवाले, तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रामदास डोईफोडे, नगरसेवक प्रदीप वाघ,संतोषभाऊ पुजारी, रंजीत काकड नगरसेवक नासिर भाई, तेजराव भाऊ मुंडे, पोलीस विभागाचे उपनिरीक्षक नारायणराव गीते जायभाये साहेब देऊळगाव राजा शहर दामिनी पथक प्रमुख जयश्रीताई काकड, अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ सवलग्नित देऊळगावराजा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रा विनायकराव कुलकर्णी, पत्रकार संघाचे सचिव व जेष्ठ पत्रकार सुरज भाऊ गुप्ता पत्रकार शेख कदीर भाई व पत्रकार राहुल नायर होते, सर्वांनी वृक्षारोपण केले , यावेळी नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा विनायक कुलकर्णी यांनी केले,

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये