ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कोरपना येथे बसस्थानक मंजूर करावे
राजुरा विधानसभेचे आमदार देवराव दादा भोगळे यांनी विधान भवन मुंबई येथे शासनाकडे केली मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
माझ्या राजुरा विधानसभा मतदारसंघातील आणि विशेषतः तेलंगणा राज्यसिमेला लागून असलेल्या कोरपना तालुक्याची निर्मिती होऊन सुमारे ३४ वर्षे लोटली आहेत. परंतु दुर्दैवाने आजही तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या कोरपना शहरात अद्यापही राज्य परिवहन महामंडळाचे बसस्थानक अस्तित्वात नाही. त्यामुळे स्थानिकांसह परीसरातील प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
याठिकाणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडे जागा उपलब्ध असून शासनाने तातडीने सदर जागा परीवहन विभागाकडे हस्तांतरित करून त्याठिकाणी अत्याधुनिक व सुसज्ज बसस्थानक मंजूर करावे, अशी मागणी शासनाकडे केली आहे.



