ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अष्टविनायक गणेश मंडळच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा येथील सिविल कॉलनी मधील श्री गणेश मंदिरामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. श्री अष्टविनायक गणेश मंडळाला देऊळगाव राजाचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री संतोष महल्ले यांनी भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले व त्यानंतर रक्तदात्यांचा सत्कार व प्रमाणपत्र वितरण व भेट पुस्तकांची भेट श्री महल्ले यांच्या शुभहस्ते देण्यात आली.

याप्रसंगी देऊळगावराजा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तसेच देउळगाव राजा पोलीस स्टेशनच्या शांतता समितीचे सदस्य व श्री गणेश प्रोत्साहन समिती देऊळगाव राजा चे सदस्य प्राध्यापक विनायकराव कुलकर्णी, तसेच या रक्तदान शिबिरासाठी संयोजन करणारे डॉक्टर श्री विठ्ठल राव देशमुख व श्री अष्टविनायक गणेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

हे रक्तदान शिबिर श्री अष्टविनायक गणेश मंडळ सिविल कॉलनी व जालना ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्याम्याने आयोजित करण्यात आले होते यामध्ये एकूण 22 रक्तदात्यानी रक्तदान केले असून यात तीन महिलांनी सुद्धा रक्तदान केले आहे या राष्ट्रीय कार्यामध्ये महिला सुद्धा मागे नाही असे दिसून येते हे शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर विठ्ठलराव देशमुख,अष्टविनायक गणेश मंडळाचे सर्व सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये