ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अपघातात जखमी झालेला युवकांचा शोध 

जखमी युवक आयसीयु मध्ये भरती 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपूर – पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या राजुरा रोड वर्धा नदी काठावर दि. २६ एप्रिल ०२४ रोजी सकाळी साडे आठ वा. स्पीड ब्रेकर वर MH-33-E-54बजाज सिटी 100काळ्या रंगाची मोटारसायकल चा ब्रेकर वर अपघात झाल्याने युवकला डोक्यावर जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाला असल्याने पोलीस स्टेशन बल्लारपूर येथील पोलीस उपनिरीक्षक गोविंद चाटे व पोलीस चमूनी जखमी युवकला ताबडतोब चंद्रपूर सरकारी रुग्णालय येथे भरती करण्यात आले.

डॉ. यांनी युवकाचा आयसीयू मध्ये उपचार चालू आहे. युवक बेशुद्ध असून पोलिसांना जख्मी युवकांचे नाव पता माहिती नसल्याने त्याचे नातेवाईचा शोध घेत आहे. जख्मी युवकांचे वर्णन वय अंदाजे 45 ते 50. रंग -काळा उंची -5 फूट 5 इंच, बांधा जाड, अंगात पांढऱ्या रंगाचा फुल शर्ट, काळ्या रंगाची पॅन्ट तसेच दाढीचे केस पांढरे झालेले आहेत.

करिता वरील वर्णन चे युवकांस ओळखत असेल तर त्याचा नातेवाईकांना संपर्क साधावा. पोलीस उप निरीक्षक गोविंद चाटे बल्लारपूर पोलीस स्टेशन.मोबाईल नं,9860601816, वर संपर्क साधावा.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये