ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

थुट्रा येथे श्री संत गजानन महाराज इवीनिंग वॉक ग्रुप गडचांदूर तर्फे वृक्षारोपण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

श्री संत गजानन महाराज इविनिंग वॉक ग्रुप गडचांदूर तर्फे थुट्रा येथिल श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी मंदिराच्या परिसरात विविध प्रकारचे झाडे लावण्यात आली आणि या निमित्ताने मंदिर परिसरात स्वच्छता अभियानही राबविण्यात आले या प्रसंगी ग्रुप चे अध्यक्ष सेवानिवृत्त उपप्राचार्य विजय आकनुरवार उपाध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य कृष्णा बततुलवार, कोषाध्यक्ष उत्तम खैरे,थुट्रा ग्रामपंचायत सदस्य अश्विनी आत्राम,अनिल डांगे,तंटामुक्ती अध्यक्ष भास्कर बावणे,केंद्रप्रमुख संजय त्रिपत्तीवार, विलास देवाळकर,सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मण खुटेमाटे, जगदीश ठावरी, रामकृष्ण नागरगोजे,मधुकर बोबडे,सेवानिवृत्त प्रा प्रमोद वांढरे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी संतोष जिल्हेवार,युवराज चुणारकर आदी मान्यवर सहभागी झाले होते त्यानी वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये