दि लिटल फ्लॉवर स्कूल चे वार्षिकत्सव संपन्न
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
दि पब्लिक एज्युकेशन चंद्रपूर द्वारा संचालित दि लिटल फ्लॉवर कॉन्व्हेंट स्कूल चे वार्षिकत्सव कार्यक्रम प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह चंद्रपूर येथे नुकतेच पार पडले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व उदघाटक म्हणून चंद्रपूर पंचायत समिती चे शिक्षण विस्तार अधिकारी धनपाल फटिंग हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दिगंबर कुरेकर,सुरेंद्र अडबले, दिनकर अडबले संस्थेच्या अध्यक्षा प्रमिला गुलाबरावजी दुबे, उपाध्यक्ष सिद्धार्थ घनश्याम गोसावी,
पालक प्रतिनिधी विलास तावाडे प्रमुख्यानी उपस्थित होते.दिप प्रज्वलीत करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी समायोचित मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष व उदघाटक धनपाल फटिंग यांनी
मोबाईल चे फायदे व तोटे यावर प्रकाश टाकला तजनंतर नर्सरी ते दहाव्या वर्गातील सर्व विध्यार्थ्यानी विविध संस्कृतिक कलाकृती सादर करून उपस्थित सर्वांची मने जिंकली.सदर कार्यक्रम संचालिका प्रमिला दुबे,मुख्याध्यपिका मीनाक्षी मून,यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाला.या कार्यक्रमाला पालक, विध्यार्थी व विध्यार्थिनी,शाळेचे शिक्षक वृंद, शिक्षेकेतर कर्मचारी यांचेमोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमांची सांगता राष्ट्रगीतानी करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन शाळेच्या अश्विनी आडेपवार विध्यार्थ्यानी कृष्णा कलोदे, अवनी बोरकर यांनी केले तर आभार अमृता चणेकर व मार्मिक वानखेडे यांनी मानले.