ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समर्थ कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उंबरखेड येथे मृदा नमुना प्रात्यक्षिक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा येथील विद्यार्थ्यांनी उंबरखेड गावामध्ये शेतकऱ्यांसाठी मृदा नमुना घेण्याचे प्रात्यक्षिक यशस्वीपणे सादर केले.

रावे कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या या प्रात्यक्षिकात विद्यार्थ्यांनी शेतीमध्ये मृदा परीक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व शेतकऱ्यांना समजावून सांगितले. पिकांची योग्य वाढ, खत व्यवस्थापन व जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी मृदा नमुना तपासणी कशी आवश्यक आहे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी उंबरखेड गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर प्रात्यक्षिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे रावे समन्वयक प्रा.मोहजितसिंह राजपूत व मृदाशास्त्र विभाग प्रमुख प्रा.विलास सातपुते यांच्या मार्गदर्शनात पार पडले.

प्रात्यक्षिक सचिन भालेराव, सौरभ बुरकुल, जय चतरकर, गौरव चोले, ज्योतिरादित्य देशमुख, ओम ढवळे, करण फुलझाडे, हर्षल जाधव, मयूर जाधव व प्रतिक जाधव या विद्यार्थ्यांनी सादर केले.

शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत अशा प्रात्यक्षिकांमुळे आधुनिक शेतीची माहिती मिळत असल्याची प्रतिक्रिया दिली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये