ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे ह्या 16 एप्रिल 2026 रेाजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

16 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन, सकाळी 11 वा. चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन, दुर्गापूर येथे प्रदूषणसंबंधी पाहणी व जनतेच्या भेटी, दुपारी 12 वा. बेलसणी येथे आगमन व कोल वॉशरी यांची पाहणी, दुपारी 12.30 ते 2.30 आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानी राखीव, दुपारी 2.30 वा. भिवापूर येथे आगमन व झरपट नदी प्रदूषण सद्यस्थिती बाबत पाहणी, दुपारी 3 वा. नियोजन भवन येथे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदुषण प्रश्नांबाबत शासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक, 3.30 वा  चंद्रपूर जिल्ह्यातील पशुपालकांच्या प्रश्नांबाबत शासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक, दुपारी 4 वा. गडचांदूर कडे प्रयाण, सायंकाळी 5 वाजता गडचांदूर येथे आगमन व अल्ट्राटेक सिमेंट, माणिकगड, येथे प्रदूषण संबंधी पाहणी व जनतेच्या भेटी, सायंकाळी 6 वा. बॉटनिकल गार्डन, विसापूर कडे प्रयाण, सायं. 7 वा. बॉटनिकल गार्डन येथे चंद्रपूर जिल्ह्यातील महत्वाच्या व्यक्तींसोबत प्रदूषणावरील उपाययोजनाबाबत चर्चा व राखीव, रात्री 7.30 वा. ताडोबा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर कडे प्रयाण, रात्री 9 वा. ताडोबा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर येथे राखीव.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये