सांवगी मेघे पोलीसांकडुन अवैधरित्या देशी विदेशी व गावठी दारू बाळगुन दारूची चोरी
विक्री करणारे महीला व इमसावर कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 12.04.2026 रोजी पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथील पोलीस पथक पेट्रोलीग करीता रवाना असता मुखबीरकडुन माहीती मिळाली की, सावंगी मेघे येथे राहणारी महीला नामे प्रियंका राकेश काबंळे रा. सावंगी मेघे व तिचा साथीदार नामे आदर्श दिपक पाहुने, रा.अल्लीपुर, जि. वध्न हे त्यांचे राहते घरी देशी विदेशी व गावठी मोहा दारूची साठवणुक करून दारूची अवैदरित्या विकी करीत आहे. अशा माहीतीवरून पंच व पो.स्टॉफसह रेड केला असता आरोपीचे घराचे घरझडतीतुन देशी, विदेशी व गावठी मोहा दारूचा तसेच दारू लपविण्याकरीता वापरलेले साहीत्यसह एकुण जु.की.33,30 / रूपयाचा माल अवैदयरित्या मिळुन आल्याने मौक्का जप्ती पंचनामा कारइवाई प्रमाणे जप्त करून आरोपीता विरुध्द पो.स्टे. सावंगी मेघे अपराध क्रमांक 269/26 कलम 65 (अ), (ई), 77 अ,83 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा नोद करून आरोपीतांना अटक करण्यात आली आहे. तसेच सदरची कार्यावाही करून पोलीसांनी यापुढे जो कुणी अवैदय दारू विकी करेल त्याचे वर अशाच प्रकारची कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा दिला.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रमोद मकेश्वर साहेब, यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक श्री पंकज वाघोडे सा, ठाणेदार पोलीस स्टेशन सावंगी मेघे व पोलीस स्टाफ पो.उप.नि. संदिप सावले, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पंचभाई, चंदु सोनोने, विरेद्र काबंळे, पो.अनं. निखील फुटाणे, हर्षवर्धन मून, यांनी केली. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संजय पंचभाई हे करीत आहे.



