ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोपालपुर येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदुर येथून जवळच असलेल्या गोपालपुर येथे अल्ट्राटेक माणिकगड सिमेंट वर्क्स CSR च्या वतीने सामान्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या शिबिरात एकूण 58 लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

शिबिरादरम्यान ग्रामस्थांची सामान्य आरोग्य तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये रक्तदाब (ब्लड प्रेशर) तपासणी देखील करण्यात आली तसेच त्यांना आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आले. ज्या लाभार्थ्यांमध्ये आरोग्य समस्या आढळल्या, त्यांना योग्य औषधे देण्यात आली व पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

या शिबिरात अल्ट्राटेक माणिकगड सिमेंट वर्क्स च्या डॉ. निकिता भामर यांनी योग्य सल्ल्यासह आरोग्य तपासणी केली तसेच शीतल गायवांकर यांनी रक्तदाब तपासणी करून लाभार्थ्यांना औषधांचे वितरण केले.

या प्रसंगी आशा वर्कर पूर्णिमा जाधव, आंगणवाडी सेविका चंद्रकला झुरमुरे तसेच गाव पाटील नागेश मडावी उपस्थित होते व त्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

या आरोग्य शिबिराचा मुख्य उद्देश ग्रामस्थांना आरोग्याबाबत जागरूक करणे व वेळोवेळी तपासणीसाठी प्रोत्साहित करणे हा होता. शिबिराचे आयोजन यशस्वीरित्या पार पडले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये