ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमाचे उद्घाटन उत्साहात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI), पुणे यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त “सामाजिक समता सप्ताह” कार्यक्रमाचे उद्घाटन जिवती येथील शासकीय आश्रम शाळेत समतादूत बालाजी मोरे व राम मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

      कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर समतादूत बालाजी मोरे यांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य” या विषयावर मार्गदर्शन केले.

या उपक्रमाचे आयोजन महासंचालक दिपा मुधोळ, निबंधक शिंदे व प्रकल्प अधिकारी फुलझेले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून ८ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान विविध उपक्रमांसह सामाजिक समता सप्ताह राबविण्यात येणार आहे.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. के. जनबंधू यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक राठोड यांनी केले. यावेळी समतादूतांनी राठोड यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. कार्यक्रमास यू.व्ही. राठोड, व्ही.एस. काणेकर, पी. के. जनबंधू, वाय.एस. भंडारे, के.पी. जनबंधू, एच.टी. सूर्यवंशी, एम.के. बल्की, पी.जी. तुराणकर, एस.डी. श्रीरामे, कु. ए.व्ही. जुनघरे, आर.यू. खाडे, पी.एस. करकडे, जे.डी. गायकवाड यांच्यासह शिक्षकवृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये