ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात आर्थिक जाणीव जागृती कार्यशाळा

शेअर मार्केट म्युचुअल फंडच्या माध्यमातून पैसा कसा वाढवता येतो याविषयी सविस्तर मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली येथे दि. २४/७/२०२३ ला प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या करिता सेबी अंतर्गत ॲडव्हायझर ऑर्गनायझेशन तर्फे आर्थिक जाणीव जागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले
या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. दिलीप बारसागडे तज्ञ मार्गदर्शक सेबी तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ अशोक खोब्रागडे उपस्थित होते डॉ. दिलीप बारसागडे यांनी आर्थिक नियोजनाचे महत्त्व पैसा वाढवण्याचे वैद्य मार्ग कसे आहेत हे सांगताना बोगस कंपनि पासून सावध राहून शेअर मार्केट म्युचुअल फंडच्या माध्यमातून  पैसा कसा वाढवता येतो याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर राजश्री मार्कंडेवार यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण कापगते तर आभार   डॉ.    रामचंद्र  वासेकर  यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम समन्वयक डॉक्टर सचिन चौधरी यांनी परिश्रम घेतले
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये