गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रस्ते अपघात कमी करण्यासाठी वर्धा पोलीसांची विशेष मोहीम

जिल्हा वाहतुक शाखा, वर्धा मार्फत पोलीस अमलंदाराच्या बुलेट गाडीवर कारवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हयामध्ये प्राणांकित अपघातामध्ये सण २०२१ मध्ये १९६, २०२२ मध्ये २१० व जुन २०२३ पावेतो १०७ नागरिकांना रस्ते अपघातामध्ये जिव गमवावा लागत असुन रस्ते अपघातात घट करण्यासाठी पोलीस अधिक्षक श्री नूरूल हसन यांचे मार्फत इतर विभागाच्या समन्वयाने कसोशिने प्रयत्न करण्यात येत असुन त्या अनुशंघाने जिल्हा वाहतुक शाखा व विविध पोलीस स्टेशन मार्फत विषेश माहीम राबविण्यात येत आहे.

पोलीस अधिक्षक यांचे सुचनेप्रमाण जिल्हा वाहतुक शाखा, वर्धा तसेच जिल्हयातील विविध पोलीस स्टेशन मार्फत विना हेल्मेट, सिटबेल्ट न लावता चारचाकी गाडी चालविणे, पंजाबी सायलेन्सर लावुण बुलेट गाडी चालवणारे तसेच नो पार्किंग मध्ये लावण्यात येणा-या वाहणचालकावर कारवाहीचे विषेश मोहीम सुरु असुन दर दिवशी कारवाही चा आढावा पोलीस अधिक्षक यांचेमार्फत घेण्यात येत आहे.

सदर मोहमदरम्यान रस्त्याचे मधोमध गाडया पार्कंग करणारे व मोठा आवाज करणारे पंजाबी सायलेन्सर लावुण शहरात फिरणा-या गाडयांवर कारवाही करित असतांना मुख्यालय येथे कार्यरत पोलीस अमलदार याचे गाडीवर जिल्हा वाहतुक शाखेमार्फत कारवाही करण्यात आली असुन त्यांना दंड आकारण्यात आला आहे व शहरात विशेष मोहीम राबवुण बुलेट दुचाकीवरिल पंजाबी सायलेन्सरवर कारवाही करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक श्री नूरूल हसन यांचेमार्फत देण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये