ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जलसाक्षरता अभियानांतर्गत प्रशिक्षणाला सुरुवात

नागपूर विभागातील जलदुतांचा सहभाग ;  चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनीचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

    जलसाक्षरता अभियानांतर्गत नागपूर विभागातील जलप्रेमी आणि जलदुतांचे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षणाला आज (३१ मार्च) सुरुवात झाली असून, या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन प्रबोधिनीचे अप्पर संचालक (प्रशिक्षण) उमेश वर्मा यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सत्र संचालक प्रमोद सूतळे, सत्र संचालक खुशाल रामगिरकर, निवृत्त कृषी अधिकारी भास्कर गायकवाड यांची उपस्थिती होती. चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी यांच्यावतीने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

    महाराष्ट्रातील वाढती पाण्याची टंचाई पाहता यशदा पुणे यांच्यावतीने जलसाक्षरता अभियान राबविण्यात येते. या माध्यमातून तालुका आणि जिल्हा पातळीवर जलदुत आणि जलप्रेमी या स्वयंसेवकांची निवड करण्यात आली असून, त्यांच्याकडून गावागावात पाण्याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. याकरिता ग्राम पातळीवर योग्य मार्गदर्शन करण्याकरिता या पायाभूत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

      नागपूर विभागातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर या जिल्ह्यातील जलदुत, जलप्रेमींचे तीन दिवसीय प्रशिक्षण पार पडणार असून, यातून जलसाक्षरतेचा पाया भक्कम करण्यात येणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये