ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अरविंद कुळकर्णी यांना तितिक्षा पुरस्कार प्रदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

तितिक्षा इंटरनॅशनल,पुणे आयोजित भव्य कला संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात व थाटामाटात संपन्न झाला

दि. २२ मार्च २०२६ रोजी तितिक्षा इंटरनॅशनल, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला कला संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत दिमाखदार, नियोजनबद्ध आणि संस्मरणीय वातावरणात पार पडला.हा भव्य सोहळा वि.का.राजवाडे आणि पोतदार सभागृह,भारत इतिहास संशोधक मंडळ, सदाशिव पेठ, पुणे येथे संपन्न झाला.

     कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने दीपप्रज्वलन व श्री गणेश स्तवनाने झाली, ज्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय व पवित्र झाले. जागतिक जलदिना निमित्त जलपूजनाचा उपक्रम घेऊन संदेश देण्यात आला.भरतनाट्यमच्या अप्रतिम सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले; ते दृश्य अत्यंत विलोभनीय व भावस्पर्शी होते.सामाजिक कार्यकर्त्या प्रिया दामले यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात न्यायमूर्ती अमृत बिराजदार,सुभेदार महेंद्र गवई,उत्कृष्ट सेवा पुरस्कार प्राप्त सी.ए.शंकर अंदानी, निर्माता व दिग्दर्शक राजेश खर्डे वेसावकर, वयोवृद्ध गायिका शोभा जोग,सुजित दातार, शहाजीराव पाटील यासारखे अनेक मान्यवर तसेच राज्यभरातून आलेले निमंत्रित साहित्यिक उपस्थित होते. याच कार्यक्रमात साहित्य व शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल मलकापूर येथील सेवानिवृत्त शिक्षक अरविंद कुळकर्णी,यांना तितिक्षा प्रमोद मातृगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.एकूण ६०० साहित्यिकातून मोजक्याच व्यक्तींना निवडपत्र मिळाले होते हे विशेष!यापूर्वी सर्वद फाऊंडेशनचा सर्वद स्टार उत्कृष्ट साहित्यिक पुरस्कार २०२४ ,राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा व राज्यस्तरीय निबंध स्पर्धा यासारख्या अनेक स्पर्धेत पुरस्कार कुळकर्णी यांना मिळाले आहेत.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रमोद कुलकर्णी, कवी विजय सातपुते यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले.रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यक्रमाला लाभला.

हा सोहळा सन्मान, संस्कृती, परंपरा आणि प्रेरणेचा सुंदर संगम ठरला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये