ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हमालाची मुलगी बनली पोलिस ; मातंग समाज बांधवांच्या वतीने सत्कार 

खडतर परिस्थितीवर मात करत ज्योती पाटोळेची जळगांव पोलीस दलात निवड 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

आई वडिलांची परिस्थिती अतिशय हलाकीची असतांना देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेषराव पाटोळे यांनी हमाली सारखे काबाडकष्ट करून आपल्या मुलांना शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे पाहून स्वतःहाच्या पोटाला पीळ देऊन आपल्या मुलांना वारंवार शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. ज्योती पाटोळे हिने आपल्या आई वडिलांचे कष्ट व मेहनत पाहून MPSC सारख्या स्पर्धा परीक्षाच्या तयारीला सुरुवात केली होती.सोबतच पोलीस भर्ती सराव व अभ्यास सुरू ठेवला होता. नुकताच पोलीस पोलीस भर्तीचा निकाल पाहताच ज्योती पाटोळे हिला दैदीप्यमान यश संपादन असून जळगांव पोलीस दलात निवड झाली आहे.देऊळगाव राजा तालुक्यातुन मातंग समाजाची पहिली मुलगी ज्योती पाटोळे हि पोलीस दलात भर्ती झाली असल्याने मातंग समाजात एक नवचैतन्य निर्माण झाले आहे.

स्थानिक रेस्ट हाऊस येथे मातंग समाज बांधवाच्या वतीने ज्योती पाटोळेसह आई वडिलांचा पेढे भरवून यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.दिलीप अर्जुने, सूर्योदय अकॅडमीचे संचालक प्रल्हाद देशमुख, शिक्षक राजू गोफणे,पत्रकार संतोष जाधव, प्रा. टी. टी. साबळे, माजी मुख्याध्यापक प्रभाकर धोंगडे,सरपंच बाळू निकाळजे,युवानेते सुनिल लोखंडे,सामाजिक कार्यकर्ते देवानंद धोंगडे,भगवान खंदारे, अँड नामवाड,राजू नाडे, मंगल अंभोरे, गजानन पाटोळे, विकास तौर,राजू पाटोळे, प्रविण हांडे, किशोर साळवे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये