ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोकमान्‍य टिळक व चंद्रशेखर आझाद यांची भाजपा कार्यालयात जयंती उत्‍साहात साजरी

टिळक व आझाद यांच्‍या स्‍वप्‍नातील भारत उभा करू या.. - ना.सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

चांदा ब्लास्ट

अन्‍याया व गुलामगीरीविरुध्‍द पेटून उठून आपली धारदार लेखणी व ज्वलंत विचारांद्वारे जनसामान्‍याला स्‍वराज्‍याचे बाळकडू पाजणारे तसेच ‘स्‍वराज्‍य हा माझा जन्‍म सिध्‍द अधिकारआहे आणि तो मी मिळविणारच’ अशी सिंह गर्जना करणारे लोकमान्‍य टिळक यांनी स्‍वराज्‍याचा कानमंत्र दिला. त्‍यामुळे स्‍वराज्‍याच्‍या लढाईमध्‍ये सामान्‍यजनता सहभागी झाली.तर महान क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांनी प्राणाची आहुती देत आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिले. या दोन्‍ही राष्‍ट्रभक्‍तांचे ऋण आम्ही फेडू शकत नाही.या राष्ट्रभक्तांना मी मनःपूर्वक अभिवादन करतो,त्यांच्या स्वप्नातील भारत सत्कर्म करून उभारू या,असे प्रतिपदान राज्याचे वने,मत्स्यपालन व्यवसाय व सांस्कृतिक कार्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केले.

ते रविवारी गिरणार चौक येथील भारतीय जनता पार्टीच्‍या कार्यालयामध्‍ये
लोकमान्‍य टिळक व चंद्रशेखर आझाद यांच्‍या जयंतीनिमित्‍त आयोजित अभिवादन कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे असंख्‍य कार्यकर्ते उपस्थित होते. मा.ना. सुधीर मुनगंटीवार यांनी लोकमान्‍य टिळक व चंद्रशेखर आझाद यांच्‍या प्रतिमांना पुष्‍पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. ते पुढे म्‍हणाले लोकमान्‍य टिळक व चंद्रशेखर आझाद यांच्‍या स्‍वप्‍नातील भारत उभा होतो आहे. याचा आनंद आहे. त्‍यांच्‍या स्‍वप्‍नांची पूर्ती करण्‍याकरिता आपण एकत्र येऊन कार्य केले पाहीजे. यावेळी कार्यकर्त्‍यांनी घोषणा देऊन दोन्‍ही महापुरुषाला अभिवादन  केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये