ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा कारागृहातील बंदीबांधवांसाठी प्रबोधनात्मक संगीतमय तसेच ब्लॅकेट वितरण

नाताळ सणानिमीत्य भारतीय सेवक संगती, वर्धा या सामाजिक संस्था मार्फत आयोजित कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी कारागृह अधिक्षक एस.आर.पवार यांच्या सहकार्याने कारागृहातील बंदयांकरीता भारतीय सेवक संगती, वर्धा या सामाजिक संस्था मार्फत नाताळ सणानिमीत्य प्रबोधनात्मक संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्याचप्रमाणे सदर संस्थे मार्फत कारागृहातील बंदयांना ब्लॅकेट वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमा दरम्यान अजय चव्हाण, मुंबई यांनी नाताळ सणाचे विविध भक्ती गिते सादर करुन बंदयांन मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण केले. त्याचप्रमाणे विजयदादा मोहोड, रा.नागपुर यांनी बंदयांचे प्रबोधनात्मक समुपदेश केले. त्यानंतर सदर संस्थेमार्फत कारागृहातील गरजु बंदयांना ब्लॅकेट वितरण करण्यात आले.

सदर कार्यक्रमाप्रसंगी भारतीय सेवक संगती, वर्धा येथील विजयदादा मोहोड, अजय चव्हाण, सुनिल ठाकरे, रिता काटे, शालिनी ठाकरे, संध्या ठवरे, आशिष कोहळे तसेच करागृह अधीक्षक, एस.आर.पवार, वरिष्ठ तुरुंगाधिकारी, नितीन क्षिरसागर, तुरुंगाधिकारी सुहास नागमोते, अमित कोठारकर, शिपाई व इतर कर्मचारी उपस्थीत होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये