मुल येथे नाम. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पदमश्री डॉ. परशुराम खुणे यांचा नागरी सत्कार संपन्न
लोककलावंत अनिरुद्ध वनकर यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने कार्यक्रमाची सुरुवात
चांदा ब्लास्ट
मुल येथील स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर फौंडेशन व जलतरण संघटना, मुल यांच्या संयुक्त विधमाणे नुकताच कला क्षेत्रातील पदमश्री पुरस्कार प्राप्त डॉ परशुराम खुणे यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. स्थानिक मा. सा कन्नमवार सभागृहात सदर सोहळा संपन्न झाला.
जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री नाम सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली व शुभहस्ते हा सत्कार सोहळा संपन्न झाला, लोककलावंत अनिरुद्ध वनकर यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने कार्यक्रमाची सुरुवात झाली, माजी जीप अध्यक्ष संध्याताई गुरुनूले, कार्यक्रमाचे संयोजक नंदकिशोर रणदिवे, भाजप महाराष्ट्र महामंत्री अलकांताई आत्राम,माजी नप अध्यक्षा रत्नमाला भोयर, सौ किरण कापगते यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ किरण कापगते यांनी केले, सदर कार्यक्रमात झाडीपट्टी कलावंत सदानंद बोरकर, शेखर डोंगरे, के आत्माराम, अरविंद झाडे, हिरालाल पेंटर, संतोष कुमार, सुनील कुकुडकर, मुकेश गेडाम अश्या अनेक कलाकारांची उपस्थिती होती, या कालावंतांचाही सांस्कृतिक मंत्री नामदार मुनगंटीवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शैक्षणिक,सांस्कृतिक, सामाजिक,पर्यावरण क्षेत्रात काम करणारे सर्वश्री डॉ राम दांडेकर, आयुर्वेद औषधी देणारे प्रल्हाद कावळे, पीएचडी प्राप्त सुधीर मुनगंटीवार व त्यांचे राजकीय कार्य यांच्यावर शोधप्रबंध लिहिणारे प्रा डॉ दैवत बोरकर,प्रा डॉ सौ राजश्री मुसतीलवार,प्रा डॉ सौ तरनुम खान,प्रा डॉ विजयसिंग पवार, प्रा डॉ राकेश चडगुलवार, पर्यावरण रक्षक सौ वर्षा भांडारकर,संगीत विशारद प्राप्त कु कुमुदिनी भोयर, सेट परीक्षा उत्तीर्ण झालेले कु रागिणी उमलवार, ओंकार चनावार, शुभम डांगे यांचा पण सत्कार करण्यात आला, याच प्रसंगी मुल येथील झाडीबोली मडलाचे अध्यक्ष सुखदेव चौथाले यांच्या झाडीचा पोहा या पुस्तकाचे विमोचन पण करण्यात आले.
सत्काराला उत्तर देतांना डॉ. परशुराम खुणे यांनी मुल शहरातील जनतेने केलेल्या सत्काराचा व प्रेमाचा विसर कधीही पडणार नाही व सांस्कृतिक मंत्री नाम सुधीर मुनगंटीवार यांनी कलाकारांच्या मानधनात वाढ करावी अशी मागणी केली, अध्यक्षीय भाषणातून सुधीर मुनगंटीवार यांनी विदर्भाच्या कलावंतांनी पदमश्री सोबतच भारतरत्न कडे वाटचाल करावी अश्या शुभेच्छा दिल्या, झाडीपट्टी रंगभूमिला शक्य ती मदत करू अशी ग्वाही दिली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण मोहूरले यांनी केले तर आभार प्रदर्शन युवराज चावरे यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय चिंतावार, मनोज रणदिवे,प्रमोद कोकुलवार,सोनू लाडवे, संजय मारकवार, प्रवीण मोहूरले चिमढा, अक्षय गजापुरे,अरुण खोब्रागडे, प्रदून्य कंदीकुरवार, व अनेक कार्यकर्ते यांनी केले.