ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिंदेवाही व सावली ग्रामीण रुग्णालयासाठी ७६ कोटींचा निधी मंजूर

आ. वडेट्टीवारांच्या प्रयत्नांचे फलित -: आयसीयू बेडसह रुग्णालय होणार अद्यावत

चांदा ब्लास्ट
ब्रह्मपुरी मतदार संघातील सिंदेवाही व सावली तालुक्यातील ग्रामीण नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी सदैव प्रयत्नशील असलेले राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, तथा ब्रम्हपुरी क्षेत्र आ. विजय वडेट्टीवार यांनी पावसाळी अधिवेशनात सिंदेवाही व सावली येथील ग्रामीण रुग्णालयात आयसीयू बेड सह इतर मूलभूत तसेच अद्यावत आरोग्य सेवा मिळावी या उदांत हेतूने सभागृहात मागणी रेटून धरल्याने अखेर आरोग्य प्रशासनाकडून वरील दोन्ही तालुक्याकरिता ७६ कोटींचा निधी मंजूर झाला असून माजी मंत्री आमदार वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा असे मानून राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक थारा देणारे राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी जनसामान्यांच्या वेदना जाणत कर्करोगाचे महागडी उपचार व जीवित हानी ही गंभीर बाब लक्षात घेत मतदार संघासह जिल्ह्या करिता नुकतीच स्वखर्चातून मोफत कर्करोग निदान अद्यावत वाहनाचे लोकार्पण केले. राज्यातील या पहिल्या प्रयोगाचे संपूर्ण राज्यभरात कौतुक होत असून जिल्ह्यात यशस्वीरित्या कर्करोग निदानाची शिबिरे सुरू आहे. अशातच ब्रह्मपुरी मतदार संघातील जिल्हा रुग्णसेवे पासून दूर अंतरावर असलेल्या सिंदेवाही व सावली तालुक्यातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी व अति संवेदनशील स्थितीत नागरिकांना अद्यावत सेवा देऊन त्यांचे प्राण वाचविण्याकरिता महत्त्वपूर्ण असलेल्या अतिदक्षता विभागासह इतर मूलभूत व अद्यावत सेवा पुरविण्याकरिता सध्या राज्य विधिमंडळाच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सिंदेवाही व सावली येथील ग्रामीण रुग्णालयाकरिता ७६ कोटींचा विकास निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी सभागृहात रेटून धरली.
यावर अर्थसंकल्पीय बजेटमध्ये ७६ कोटींच्या विकास निधीला मंजुरी देण्यात आली. माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांच्या या प्रयत्नांना यश मिळाल्याने सिंदेवाही व सावली या तालुक्यातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट होणार असून नागरिकांना आगामी काळात पुरविण्यात येणाऱ्या उत्तम आरोग्य सेवेचा लाभ होणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये