ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रोबोटिक व स्टिम लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची बुध्दीमत्ता वाढण्यास मदत होईल – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

रोबोटिक व स्टिम लॅबचे उद्घाटन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा  : सध्याचे युग हे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच एआयचे आहे. नगर परिषद व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये भविष्याचे नियोजन करुन रोबोटिक व स्टिम लॅब सुरू करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील पाच शाळांच्या अपग्रेडेशनचे काम हाती घेण्यात आले असून रोबोटिक व स्टिम लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची बुध्दीमत्ता वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.

कर्वे समाज सेवा संस्था पुणे, कुंभलकर कॉलेज ऑफ सोशल वर्क यांच्या संयुक्त विद्यमाने बेंन्टलर ऑटोमोटिव्ह इंडिया प्रा.लि. यांच्या सीएसआर निधितून नगर परिषदेच्या वसंत प्राथमिक शाळेत रोबोटिक व स्टिम लॅबचे उद्घाटन पालकमंत्री डॉ.भोयर यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, शिक्षण सभापती प्रियंका खंगार, बेंन्टलर ऑटोमोटिव्हचे व्यवस्थापकीय संचालक मुकुंद गणगणे, कर्वे समाज सेवा संस्थेचे डॉ.महेश ठाकूर, नगरसेवक सचिन होले, सोनल त्रिवेदी, युगांत कुंभलकर, मुध्याध्यापिका प्रणीता आखतकर, डॉ.चंदु पोपटकर आदी उपस्थित होते.

कर्वे शिक्षण संस्था समाजसेवेचे काम करित आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिला शिक्षणासाठी पुढाकार घेतला, त्यांचा वारसा पुढे नेण्याचे काम सुरू आहे. वसंत प्राथमिक शाळेच्या नुतनीकरणासाठी 1 कोटी 25 लक्ष निधी उपलब्ध करुन दिला, असल्याचे पालकमंत्री डॉ.भोयर यांनी सांगितले.

रोबोटिक आणि स्टीम लॅब या शालेय आणि तांत्रिक शिक्षणातील आधुनिक प्रयोगशाळा आहेत; ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून रोबोटिक्स, कोडिंग, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित शिकवतात. कोडिंग सॉफ्टवेअरचा वापर करून विद्यार्थी स्वतः रोबोट्स डिझाइन, प्रोग्राम आणि तयार करतात, ज्यामुळे सर्जनशीलता, समस्या निवारण आणि भविष्यातील तांत्रिक कौशल्ये विकसित होण्यास मदत होते.

यावेळी मुकुंद गणगणे व डॉ.महेश ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले. सुरूवातीस पालकमंत्र्यांनी फित कापूण रोबोटिक व स्टिम लॅबचे उद्घाटन करुन पाहणी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये