Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

निर्मल बेकरी चौक, वर्धा येथुन मोपेड गाडी चोरणारा आरोपी गजाआड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

यातील नमुद घटना ता. वेळी व स्थळी, यातील फिर्यादी यांनी त्यांची होन्डा कंपनीची मोपेड गाडी क्र. MH-32 AW-6909 ही निर्मल बेकरी चौक वर्धा येथे गाडीलाच चाबी लाऊन ऊभी करून दुकानात सामान खरेदी करण्या करीता गेले व सामान खरेदी करून काही वेळाने परत आले असता त्यांना त्यांची मोपेड गाडी ही ठेवलेल्या ठिकाणी दिसली नाही. आजुबाजुला शोध घतला असता मिळुन आली नाही. कोणत्या तरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची एक जुनी वापरती होन्डा कंपनीची ग्रे रंगाची अँक्टीवा मोपेड गाडी क्र. MH-32 AW-6909 किंमत 60,000/- रू. चा मोपेड गाडी चोरून नेली आहे. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून, पो.स्टे. वर्धा शहर येथे अपराध क्रमांक 2126/2024 कलम 303 (2) BNS प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हा तपासावर असतांना मुखबिर कडुन खात्रीशिर मिळालेल्या माहीती वरुन आज दिनांक 01/01/2025 रोजी आरोपी नामे सुर्यभान मुरलीधर चौधरी वय 35 वर्षे रा. नालवाडी, वर्धा यास ताब्यात घेवुन पंचा समक्ष सदर गुन्हयातील एक जुनी वापरती होन्डा कंपनीची ग्रे रंगाची अॅक्टीवा मोपेड गाडी क्र. MH-32 AW-6909 किंमत 60,000 रु ची मोपेड गाडी पंचा समक्ष कबुली दिल्याने जप्त करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर तसेच पोलीस स्टेशन वर्धा शहरचे ठाणेदार पो.नि. पराग पोटे, स.पो.नी. शुभांगी वाजे, यांचे निर्दशनानुसार पो.स्टे. वर्धा शहर येथील गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा. राजेश राठोड ब.क्र. 879, पोलीस अंमलदार सुरज जाधव ब.क्र. 1586, संभाजी मुंडकर ब.क्र. 1649, पो.शी. अशफाक शेक ब.नं. 1600, चालक पो.उप-नी गजानन जाचक, यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये