ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्काऊट गाईडचा जिल्हा मेळावा 3 जानेवारीपासून

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

स्थानिक वर्धा भारत स्काऊट गाईड व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते माजी आमदार सुरेश भाऊ देशमुख यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त व नयारा एनर्जी यांच्या विशेष सहकार्यांनी 37 वा जिल्हा मेळावा देवळीच्या एस.एस.एन.जे.महाविद्यालयाच्या प्रांगणात 3 जानेवारी ते 6 जानेवारी दरम्यान संपन्न होत आहे.

सदर मेळाव्याचे उद्घाटन 5 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वा. खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी राहूल कर्डिले

यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक नुरूल हसन व मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद तर विशेष अतिथी म्हणून माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख, यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर देशमुख, नाट्य दिग्दर्शक हरिश इथापे, डायट चे प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे, नयारा एनर्जी डेपोचे प्रबंधक संजय अग्रवाल, प्रा. डाॅ. विलास देशमुख, प्रदीप दाते, सतीश राऊत, शिक्षणाधिकारी तथा जिल्हा मुख्य आयुक्त सचिन जगताप, रोव्हर स्काऊट चे जिल्हा आयुक्त कॅप्टन मोहन गुजरकर, उषा तळवेकर व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ प्रभाकर ढाले उपस्थित राहणार आहेत.

सदर स्काऊट गाईड मेळाव्यात 4 जानेवारी रोजी साहस खेळ, प्रथमोपचार स्पर्धा, आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा, समूहगीत गायन, प्रश्न मंजुषा, चित्रकला, बिनभांड्याचा स्वयंपाक, शेकोटी कार्यक्रम तर 5 जानेवारी रोजी आनंद मेळावा, स्किलोरामा, शोभा यात्रा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

6 जानेवारी रोजी शिबिरातील स्काऊटस व गाईड्स देवळी शहरात सकाळी 7 वा. “स्वच्छ शहर सुंदर शहर’ उपक्रम राबविणार आहेत. 6 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वा. समारोप कार्यक्रम खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, आमदार रणजित कांबळे, माजी शिक्षक आमदार नागो गाणार, माजी आमदार सुरेशभाऊ देशमुख, यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर देशमुख, उपाध्यक्ष सतिश राऊत, सचिव प्रकाश ढांगे व माजी न.प. उपाध्यक्ष नरेंद्र मदनकर उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्यात 70 शाळेतील 1600 स्काऊटस व गाईड्स त्यांच्या शिक्षकांसह सहभागी होणार आहेत. यशस्वीतेकरीता रोव्हर स्काऊट चे जिल्हा आयुक्त कॅप्टन मोहन गुजरकर, जिल्हा संघटक नितेश झाडे, जिल्हा संघटक वैशाली अवथळे, रोव्हर लिडर संतोष तुरक, रोव्हर लिडर प्रा. रविंद्र गुजरकर, राजहंस जंगले, अभिजीत पारगावकर, याकुब शेख, सुरेन्द्र उमाटे, योगेश आदमने, आसीफ शेख, संकेत हिवंज, शेखर भोगेकर, अक्षय जबडे यांच्यासह देवळीच्या एस.एस.एन.जे.महाविद्यालयातील रोव्हर्स व रेंजर्स प्रयत्न करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये