Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ट्रक – दुचाकीच्या धडकेत इसम जागीच ठार

सावली - हिरापूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना

 चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

हिरापूर येथील टोल नाक्याजवळ जवळ ट्रकच्या धडकेत इसम ठार झाल्याची घटना (दि. ३१) रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. सुरेश गोमाजी आगरे (५५) असे मृतकाचे नाव असुन तो भेजगाव येथील रहिवासी होता.

       हिरापूर येथील राष्ट्रीय महामार्गावर टोल नाक्याची निर्मिती केली आहे. याच टोलनाक्यावर गडचिरोली वरुन मृतक हा आपल्या स्कुटी क्र. एमएच ३४-एएक्स ३४५ या वाहनाने सावलीकडे येत होता. तर एमएच ३४-एबी ३५३३ क्रमांकचा ट्रक टोल नाक्यावरुन सावलीकडे येत असतांना हा अपघात घडला. अपघात इतका भिषण होता की,दुचाकीस्वार हा ट्रकच्या टायरमध्ये आला. त्यामुळे त्याचे शरीराचे दोन तुकडेच झाले. ट्रकने २०० मिटर पर्यंत फरफटत नेले. यात तो जागेवर गतप्राण झाला.

घटनेची माहिती सावली पोलीसांना होताच सावलीचे ठाणेदार जीवन राजगुरु हे आपल्या ताफयासह घटनास्थळी दाखल झाले. मृतकाचे शव उत्तरीय तपासणी करीता सावली येथील रुग्णालयात आणण्यात आले असुन पुढील तपास सावली पोलीस करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये