ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड कडून हिमोग्लोबीन तपासणी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

या नवीन धावपडीच्या युगामध्ये गांवातील किशोर वयीन मुलींमध्ये हिमोग्लोबीन चे प्रमाण कमी असते हे लक्षात घेत अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ कडून आपल्या सीएसआरअंतर्गत जवळपास असलेल्या बैलमपूर,मानोली व नोकारी या तीन गांवातील एकूण ५८ किशोरी मुलींचे हिमोग्लोबीन टेस्ट करून त्यांना औषधोपचार करण्यात आलात

या शिबिरात शासकीय रुग्णालय देवाडा येथील डॉक्टर व सिस्टर यांचे मोलाचे सहाय्य मिळाले

यावेळी बोलताना डॉक्टर स्नेहा मोते यांनी सांगितले कि, आजच्या खान पणामुळे व दगदगीमुळे किशोर वयीन मुलींच्या रक्तामध्ये हिमोग्लोबीन चे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी असते व त्यामुळे त्यांना अनेमिया ,सिकलसेल तसेच मासिक पाळीतील आजार होऊ शकतात,जर योग्य वेळी त्यांची तपासणी करून आपण जर औषोधोपचार केलात तर त्यांचा या आजारांपासून बचाव होऊ शकतो.

यावेळी माणिकगढ कडून सर्व किशोरी मुलींना हिमोग्लोबीन वाढीसाठी आई रॉन व मल्टीव्हीटॅमिन टॉनिक देण्यात आलेत.

गांवातील सरपंच व नागरिकांनी या उपक्रमाची स्तुती केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये