देऊळगांव राजा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे दि. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये शाळेचे प्राचार्य श्री. आर. बी. कोल्हे, पर्यवेक्षक श्री. जाधव, पूर्व माध्यमिक विभाग प्रमुख श्री. राठोड तसेच शाळेतील सर्व महिला शिक्षिका, श्री. तेलंग सर, श्री. रिंढे सर मंचकावर उपस्थित होते. तसेच शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षिका सौ. रामपूरकर मॅडम या होत्या तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमवंशी मॅडम नी केले तर कु. आर्या मिनासे हिने सुमधुर आवाजात गीत सादर केले तसेच कु. अक्षरा लंगोटे, कु. अमृता शिंदे, कु. सायली चव्हाण, चि. अगस्थ तिडके या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे म्हणुन लाभलेले प्राचार्य श्री. आर. बी. कोल्हे, श्री डी. व्ही. जाधव यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देत मुलींना संदेश दिला की शिका आणि स्वावलंबी बना. तसेच कार्यक्रम मार्गदर्शिका सीमा निमोदिया मॅडम यांनी मुलींना काही दिवंगत महिलांचे उदाहरण देत सक्षम आणि आत्मनिर्भर होण्याची प्रेरणा दिली. कार्यक्रम प्रमुख श्री. तेलंग सर यांनी स्व हस्तलिखित कवितेच्या माध्यमातून महिलांचे कौतुक केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. रिंढे सर यांनी शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. महिला दिनानिमित्त प्राजक्ता खांडेभराड व तिच्या चमु ने सुंदर नृत्य सादर केले. व 8 ब च्या विद्यार्थिनीनी एक नाटिका सादर केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा ज्येष्ठ शिक्षिका सौ. रामपुरकर मॅडम यांनी अध्यक्षीय भाषण द्वारे कार्यक्रमाचा समारोप केला. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु. स्नेहल गरड हिने केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु. आदिती शिंगणे हिने केले.