ग्रामीण वार्तामहाराष्ट्र

मनपा इंजिनियर आशिष भारती यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी

चांदा ब्लास्ट

विठ्ठल मंदिर प्रभाग कं. १५ चंद्रपूर येथील अनेक वर्षांपासून मजदूर चौक येथे सार्वजनिक शौचालय अस्तित्वात आहे. त्या शौचालयाच्या वापर या परिसरातील पुरूष व महिला करतात. महापालिकेच्या शौचालयाच्या बाजुला पालिकेने सुरक्षा भिंत बांधली होती. अनेक वर्षापासून ती भिंत असून शौचालयाबाजूला राहण्याऱ्या माधुरी किशोर बानकर या महिलेव्दारे ही भिंत तोडण्यात आली आहे. तिचा वास्तव्य समोरच्या रोड असतांना मागून गाड्या टाकण्याकरिता महापालिकेची सुरक्षा भिंत तोडण्यात आली. त्यांची तक्रार मागील वर्षी करण्यात आली होती. नगर प्रशासनाने प्रत्यक्ष येवून पाहणी केली असता त्या महिलेवर एफ.आय.आर. करून व ती भिंत बांधून देण्यात तयार आहे असे आश्वासन मागील वर्षी दिली होती.

परंतू एक वर्ष लोटून ही भिंत बांधण्यात आलेली नाही. या महिलेनी मला मागून येने जाण्याकरिता रस्ता पाहीजे असे कारण सांगून महापालिकेच्या इंजिनियर आशिष भारती यांनी दि. २२ मे २०२४ ला अतिक्रमण पथक जे.सी.बी. व पोलीस बंदोबस्त घेवून आले. आमची बाजू न ऐकता त्या महिलेच्या म्हणण्यावर रोड करासाठी शौचालयाची पायऱ्या व रेलिंग उध्वस्त करून गेले. त्या परिसरातील नागरिक वैतागल्यामुळे त्याला या जागेवरून परत जावे लागले. या प्रकरणात आर्थिक व्यवहार झाला असवा असे नागरिकांचे म्हणने आहे. कोणताही लेखी आदेश नसतांना ही सुरक्षा भिंत तोडली कशी व शौचालयाच्या पायऱ्या तोडल्या कशा याचा खुलासा येत्या दहा दिवसात आम्हाला सादर करावा.

या मागणीचे निवेदन उपायुक्त पाटील साहेब, इंजिनियर हजारे साहेब यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केले. येत्या दहा दिवसात याचा खुलासा सादर करावा व तोडलेले बांधकाम पुर्ण करून देण्यात यावे अशी मागणी वार्डातील रहिवाश्यांनी केली आहे. या मागणीची पुर्तता येत्या दहा दिवसात न झाल्यास महापालिके समोर तिर्व आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रभागाचे माजी नगरसेवक विशाल निंबाळकर, माजी नगरसेविका सौ. संगिता खांडेकर, भापजा नेते राजेंद्र खांडेकर, विनोद शेरकी, मजदूर मंडळाचे अध्यक्ष मारोती क्षिरसागर, विजय काडे, राजू काटकर, लाला रागीट, सुखदेव सोपनकर, कपिल जवादे, रोहीत नागापूरे, प्रकाश गर्गेलवार, वैभव येरजवार, वासुदेव सोपनकर, श्रीकांत गर्गेलवार, अशोक पडगिलवार, विजय गर्गेलवार, राकेश काटकर, विकास चंदनखेडे, घनश्याम राजुरकर, निखील चौधरी, पिंटू वाकुलकर, नागेश देशमुख, पंकज पडगेलवार, रोमी तपासे, सुभाष रागीट, नथ्थू थोरात यांनी एका पत्रकाव्दारे कळविले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये