Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा उपविभागीय पोलीस पथक यांनी नाकेबंदी करून दुचाकी वाहनासह पकडला 1,45,800 रू चा विदेशी दारूचा माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 12.08.2024 रोजी उपविभागीय कार्यालयातील पोलीस पथक यांना गोपनिय माहीती वरून आरोपी नामे 1) रज्जत राजु धुल रा. पुलफैल, वर्धा 2) कोहीनूर उके रा. आयुवेदीक कॉलेज जवळ सांवगी मेघे वर्धा यांचेवर मसाळा चौक, वर्धा येथे नाकेबंदी करून प्रोव्हीशन रेड केला असता त्यांना पोलीस दिसताच त्यानी त्यांचे ताब्यातील सुजुकी कंपनीची बर्गर्मेन व त्यांचेवर ठेवलेला विदेशी व देशी दारूचा माल हा मौक्यावर सोडुन शेतातील जंगली भागातुन पसार झाले. मौक्यावरून एका विना नंबर प्लेटची काळया रंगाची सुजुकी कंपनीची बर्गमॅन दुचाकी मोपेड च्या डिक्की मधुन व समोरील पायदानावरून चार खरडयाचे खोक्यात ऑफीस चाईस, ऑफीसर चाईस ब्लु रॉयल स्टेंग, आयकॉनिक व्हाईट, टॅगो कपंनीची देशी दारू तसेच एक आरोपीचा सुरू असलेला मोटोरोला कंपनीचा मोबाईल असा एकुन जुकी 145,800/- रू. चा माल अवैध्यरित्या विनापास परवाना मिळुन आल्याने जप्तीपंचनामा प्रमाणे जप्त करण्यात आले

पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे पसार आरोपी नामे १) रज्जत राजु धुल रा.पुलफैल, वर्षा 2) कोहीनूर उके रा. आयुवेदीक कॉलेज जवळ सांवगी मेधे वर्धा यांचे विरुध्द कलम 65 अ ई. 77 अ 83 म.दा.का सहकलम 3 (1) 181, 130/177, 50(2) मो.वा.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस स्टेशन सेवाग्राम येथील पोलीस अधिकारी क्रर्मचारी करीत आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. नुरुल हसन सा, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा. याचे विशेष मार्गदर्शन प्र. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्मा, श्री. रोशन मु. पंडीत सा. यांचे सुचनेप्रमाणे पो.उप.नि. परवेज खॉन, उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाचे पो.हवा. अमर लाखे, पोलीस कर्मचारी मंगेश चावरे पवन निलेकर समीर शेख यांनी यशस्वी रित्या पार पाडली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये