ताज्या घडामोडी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने बदलले सेनापती – ग्रामीण व शहर जिल्हाध्यक्ष पदावर नव्या नियुक्त्या

हरिश शर्मा पुन्हा एकदा ग्रामीण जिल्हाध्यक्ष तर राहुल पावडेंना महानगराची जबाबदारी

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

लोकसभा 2024 निवडणुकीत 400 पार जाण्याचे उद्दिष्ट भाजपाच्या शिर्ष नेतृत्वाने ठेवले असून त्यादृष्टीने पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. ह्याच मोहिमेचा भाग म्हणून महाराष्ट्र भाजपा देखिल विविध स्तरावर मोर्चेबांधणी करत असुन पक्षांतर्गत फेरबदल सुरू आहेत. ह्या अनुषंगाने प्रदेश भाजपने राज्यातील विविध ठिकाणचे जिल्हाध्यक्ष बदलले असुन जाहिर झालेल्या बदलांमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचाही समावेश आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ह्यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची नविन यादी प्रसिध्द केली असुन त्यानुसार चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावरून देवराव भोंगळे ह्यांना मुक्त करण्यात आले. त्यांच्याकडे ह्यापूर्वीच राजुरा विधानसभा प्रमुख पदाची सुत्रे देण्यात आली आहेत. तर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे ह्यांनाही कार्यमुक्त करण्यात आले आहे.

चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावर माजी जिल्हाध्यक्ष तथा बल्लारपूर नगर पालिकेचे माजी अध्यक्ष हरिश शर्मा ह्यांची पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली असून महानगर जिल्हाध्यक्ष पदावर माजी उपमहापौर राहुल पावडे ह्यांना जबाबदारी देऊन त्यांच्या नेतृत्वगुणांवर पक्षाने विश्वास दाखविला आहे. महानगर जिल्हाध्यक्ष होताच राहुल पवाडे यांच्यासमोर केवळ लोकसभा नव्हे तर चंद्रपूर महानगर पालिकेत पुन्हा एकदा पक्षाची निर्विवाद सत्ता आणण्याची मोठी जबाबदारी सोपविण्यात आली असुन ते ह्या आव्हानाला तोंड देऊन आपली नेतृत्व क्षमता सिद्ध करणार काय ह्याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये