ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संततधार पावसाने नागभीड-नागपूर मार्ग पाच तास बंद

अनेक वाहणाच्या रांगा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

नगर परिषद क्षेत्रात येणाऱ्या नागभीड-नागपूर मार्गांवरील बाम्हणी नाल्यावर संततधार पावसामुळे आज सकाळ पासून नाल्यावर तीन फूट पाणी असल्याने नागपूर-गडचिरोली कडे जाणारी शेकडो वाहने उभी होती. नगर परिषद क्षेत्रात येणाऱ्या पुलावरून कोणतीही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन व महसूल विभाग सज्य असल्याचे दिसून आले. सकाळी सात वाजेपासून तर बारा वाजेपर्यंत मार्ग खुला होऊ न शकल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागला तर काहींनी दुसरा मार्ग शोधाण्याचा प्रयत्न केला.

नागभीड नगर परिषद क्षेत्रात येणाऱ्या जुन्या पुलाचे नवीन पुलात रूपांतर करावे मात्र हा राष्ट्रीय मार्ग असल्याने आता काही करता येत नाही असे सांगण्यात आले. पहिल्याच पुरात पाच तास वाहने उभी होण्याची दोन, तीन वर्षातील ही पहिली वेळ आणि पूर पाहण्याचा आनंद नागभीडकर वाशियांना घेता आला. सतत धार पावसाने तालुक्यातील जण जीवन ठप्प झाल्याचे चित्र दिसून आले असले तरी पोलीस व महसूल विभाग सतर्क असल्याचे चित्र दिसून आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये