ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मा. जिल्हाधिकारी, वर्धा यांची निवडणुकीच्या अनुषंगाने वर्धा जिल्हा कारागृह येथे भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

        दि. २३/१०/२०२४ रोजी मा. श्री. राहुल कर्डीले, जिल्हाधिकारी, वर्धा यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने वर्धा जिल्हा कारागृह वर्ग-१ येथे भेट दिली. सदर भेटी दरम्यान मा. जिल्हाधिकारी यांनी कारागृहातील कामकाजाची तसेच सुरक्षा व्यवस्थेची तपासणी करुन कारागृहात बंदयांना देण्यात येणाऱ्या सोई-सुविधा याबाबत पाहणी केली. तसेच मा. जिल्हाधिकारी यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने कारागृहात आभासी बैठक घेवु नये, आणि कारागृहात कोणतीही हालचाल होणार नाही याबाबत विशेष सुचना दिलेल्या आहेत.

सदर भेटी दरम्यान कारागृह अधीक्षक नितीन क्षिरसागर, तुरुंगाधिकारी श्रेणी-२,  जितेंद्र भावसार, तुरुंगाधिकारी श्रेणी-२ सुहास नागमोते, तसेच उपअभियंता, सा.बां.वि. येथील मतिन नलगिरे शिपाई अमित कोठारकर,  अतुल जाधव, ईत्यादी कारागृह कर्मचारी व कारागृहातील बंदी बांधव उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये