ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधि. अशोक डोईफोडे

संपूर्ण देशभरात श्रीराम प्राणप्रतिष्ठा निमित्त विविध कार्यक्रम सुरू असून संपूर्ण देश श्री राम नामात रंगून गेला आहे यामध्ये राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल देऊळगाव राजा येथील विद्यार्थी हि श्रीरामांच्या भक्ती मध्ये दंग झाले असून अयोध्या येथे होत असलेल्या रघुपती श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल देऊळगाव राजा येथे फटाक्याच्या आतिषबाजीत आणि दीपोत्सवात श्रीरामांचे संगीतमय सुंदरकांड आयोजित करण्यात आले होते.

यावेळी राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल मधील बाल गोपालांनी श्रीराम आणि माता सीतेचा वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधले होते यासाठी मोहिनी बेद्रे, कल्याणी खरात, शेजल बंसिले,दिपाली गवई, दुर्गा दोडके, यांनी सदर कार्यक्रमाचे नियोजन केले असून राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल च्या अध्यक्ष मीनाताई शेळके तसेच सचिव डॉक्टर रामप्रसाद शेळके यांनी राम आणि सीता झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले कार्यक्रमांनंतर श्रीराम ललाची आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये