Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

‘वाचाल तर वाचाल’ ज्ञान संपन्नही व्हाल – प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव    

निमणी येथे विद्यापीठ आपल्या गावात उपक्रम.   

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

वाचाल तर वाचाल या वाक्यातच आपल्याला वाचनाचे महत्व लक्षात येते तसेच जर ज्ञानाचा अमूल्य खजीना आपल्याकडे असेल तर यश आपल्यापासून दूर नाही असे. मत डॉ. शैलेंद्र देव यांनी व्यक्त केले ते गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स गडचांदूर ग्रामपंचायत निमणी यांच्या संयुक्त विद्यमाने निमणी येथे ‘विद्यापीठ आपल्या गावात’सुरू असलेल्या उपक्रम कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.

 प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच अतुल धोटे तमुस अध्यक्ष प्रफुल काळे समन्वयक विठ्ठल कोरडे प्रा.राजू खाडे प्रा.संदीप धांडे प्रा.उमेश राजुरकर हजर होते.

        पुढे डॉ. देव म्हणाले की, पुस्तक वाचनाचा छंद असणाऱ्या व्यक्तीला दैनंदिन आयुष्यात उद्भवणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी नेहमी मार्ग सापडत असतो त्यामुळे भरपूर वाचन करायला हवे असा सल्लाही दिला.

     विठ्ठल कोरडे यांनी सांगितले की,पदवी प्राप्त करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविल्या जात असल्याने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश राजूरकर संचालन मनीषा गारघाटे तर आभार कविता हनुमंते यांनी मानले यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी हजर होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये