ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ग्रामपंचायत पाटोदाचे आदर्श सरपंच भास्कर पेरेपाटील उद्या ब्रह्मपुरीत

दिव्यदीप बहुउद्देशीय संस्थच्या वतीने आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

दिव्यदीप बहुउद्देशीय संस्था ब्रह्मपुरीच्या वतीने १५ जुलैला पंचायत राज सशक्तीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाला औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा येथील आदर्श सरपंच भास्कर पेरेपाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. ब्रह्मपुरी शहरात त्यांचा हा पहिलाच कार्यक्रम आहे. गाव कसा सुधारायचा, गावाचा सर्वांगीण विकास कसा साधायचा, गावातच रोजगार निर्माण करण्यासाठी कसे प्रयत्न केले पाहिजेत हे आदर्श सरपंच भास्कर पेरेपाटील यांच्या वाणीतून ऐकावयास मिळणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्य कार्यकारी  अधिकारी कपिल कलोडे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय पुरी उपस्थित राहणार आहेत. दिव्यदीप बहु. संस्थेच्या अध्यक्ष डॉ. स्निग्धा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये