ताज्या घडामोडी

एफ. ई. एस. गर्ल्स कॉलेज येथे जागतिक लोकसंख्या दिन संपन्न

चांदा ब्लास्ट :

चंद्रपुर : फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपूर द्वारा संचालित एफईएस गर्ल्स कॉलेज चंद्रपूर अर्थशास्त्र विभाग आणि आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिन संपन्न झाला. जागतिक लोकसंख्या दिनाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. मीनाक्षी ठोंबरे तर प्रमुख म्हणून अतिथी डॉ. राजेंद्र बारसागडे प्रा. योगेश निमगड़े  उपस्थित होते.

प्राचार्य मीनाक्षी ठोंबरे यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये लोकसंख्या विषयी सर्व अंगानी प्रकाश टाकला, तसेच डॉ. राजेंद्र बारसागडे यांनी लोकसंख्या वाढीची कारणे व वाढत्या लोकसंख्येचे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले. प्रा. योगेश निमगड़े यांनी लिंग समानतेवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. राजेश चिमणकर व आभार प्रदर्शन प्रा. बनसोड यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये